जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील एम. जे. कॉलेज मागील भूषण कॉलनी परिसरातून पेंटिंग काम करण्यासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली आहे. शनिवारी २५ मार्च रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश रघुनाथ चौभे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव या तरुणाने भूषण कॉलनीतील काशीविश्वनाथ मंदीराजवळ दुचाकी पार्किंगला लावलेली होती. तेथे तो पेंटिंग कामासाठी आलेला होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांने त्यांची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी करीत आहे.