जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मेहरूण परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाला अश्लील शिवीगाळ करून चापटाबूक्कयाने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवार २४ मार्च रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राकेश मधुकर मोरे (वय -२१, रा. मेहरूण, जळगाव) हा तरुण हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता त्याच्या घरासमोर राहणारा अमजद खान याने कोंबडीचा खुराडा मागितला. त्यानंतर राकेश मोरे यांनी कोंबडीचा खुराडा देण्यास उशीर केला. या कारणावरून अमजद खान याने राकेश मोरे याला अश्लील शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये राकेशला दुखापत झाली. दरम्यान राकेशने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता संशयित आरोपी अमजद खान रा. मेहरून याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्रसिंग पाटील करीत आहे.