जळगाव;- कृषि क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांना कृषि विभागाकडून विविध पुरस्काराने गौरविले जाते. सन 2020 या वर्षात कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि रत्न, वसंतराव नाईक कृषि भुषण, जिजामाता कृषि भुषण, उद्यान पंडित आणि वसंतराव नाईक शेतीमित्र या पुरस्कारासाठी आपल्या तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क करुन प्रस्ताव तयार करावा व तो पस्ताव तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.