जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनीअरिंग, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व डाटा सायन्स या विभागातर्फे “रिसेंट इनोव्हेशन इन ब्लॉक चेन टेक्नोलॉजी अॅन्ड सायबर सेक्युरिटी”या विषयावर आधारित एक दिवसीय राष्ट्रीय परिषद महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स व भारत सॉफ्ट सोल्युशन यांच्या सहकार्याने हि परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात व्यासपीठावर औरंगाबाद येथील बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणक विभागाचे प्रा. डॉ. एस. एन निंभोरे, रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. सौरभ गुप्ता, संगणक व माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील व डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. प्रमोद गोसावी उपस्थित होते. यावेळी प्रा.लीलकंठ दिवांगण यांच्या “डेटा अनालिटिक्स विथ पायथॉन फॉर बिगीनर” तसेच प्रा. सौरभ गुप्ता यांच्या “इनोव्हेशन अँड कंस्पेक्ट ऑफ इट्रप्रनरशिप” या दोन पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमात विभागप्रमुख प्रा. डॉ. सोनल पाटील यांनी परिषदेच्या प्रास्ताविकेत नमूद केले कि, या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट संशोधक, अभियंते आणि उद्योजक यांना एकत्र आणणे हे आहे, जे विविध ठिकाणांहून या क्षेत्रात काम करतात आणि परिषदेत त्यांच्या कल्पना आणि निष्कर्षांची देवाणघेवाण करतात. ही परिषद तज्ञ आणि तरुण संशोधकांसाठी रिसेंट इनोव्हेशन इन ब्लॉक चेन टेक्नोलॉजी अॅन्ड सायबर सेक्युरिटीच्या क्षेत्रातील संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. या राष्ट्रीय परिषदेचा संशोधक व विध्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. उद्योग ४.० व एज्युकेशन ४.० ही चौथी ओद्योगिक क्रांती आहे जी बऱ्याच समकालीन ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा समावेश करते या क्रांतीसोबत आजच्या युवकांनी जुळायला पाहिजे तसेच जागतिक स्तरावरील बदलत्या घडामोडींचे आकलन करून संगणक, व्यवस्थापन व इतर पूरक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यावर भर द्यावा व या बदलत्या परिस्थितीत करिअरचे नियोजन कसे करावे यांचे अनेक उदाहरणांसहित त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर प्रा. डॉ. एस. एन निंभोरे यांनी या राष्ट्रीय परिषदेत ब्लॉकचेन म्हणजे काय, सायबर सुरक्षा ट्रेंड, सायबर फॉरेन्सिक्स, ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, सॉफ्ट कॉम्प्युटिंग, डेटा कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग या विविध विषयावर विध्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. ब्लॉक चेन टेक्नोलॉजी अॅन्ड सायबर सेक्युरिटी या निगडीत अनेक बाबींवर चर्चा या परिषदेत करण्यात आल्या. प्राध्यापक, उद्योग जगतातील व्यक्ती तसेच संशोधक विद्यार्थी यांनी कॉन्फरन्ससाठी सादर केलेले रिसर्च पेपर्स आयएसबीएन क्रमांक असलेल्या नामांकित प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केले जाणार आहेत. विविध राज्यांमधून जवळपास ६७ पेपर या राष्ट्रीय परिषदेत सादर झाले त्यातून ५७ पेपरची निवड यावेळी करण्यात आली होती या परिषदेत नामांकित शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. या परिषदेला प्रा.स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा.प्रेमनारायण आर्य, प्रा.तुषार वाघ, प्रा. निलेश इंगळे, प्रा.लीलकंठ दिवांगण, प्रा.माधुरी झवर, प्रा.पूजा नवल, प्रा.विकास सावन, प्रा.योगिता नेमाडे, प्रा.शरयू बोंडे , प्रा. पल्लवी सुरवाडे यांनी सहकार्य केले. तसेच सूत्रसंचालन प्रज्वल वकुलकर व ईश्वरी नेमाडे यांनी तर आभार प्रा. प्रमोद गोसावी यांनी मानले. सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.