जळगाव ;- गेल्या ४५ दिवसांपासून जिल्ह्यातील सराफी पेढ्या बंद असून यामुळे कोट्यवधींचा फटका सराफ व्यावसायिकांना बसला आहे. मात्र आता त्यांना दिलासा मिळाला असून आता जिल्ह्याती सराफ बाजार उघडता येतील मात्र सर्वाना फिजिकल डिस्टेसिंगचे पालन करावे लागणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली . गुढी पाडवा आणि अक्षय्य तृतीया या मोठ्या सणांमध्ये नागरिकांना सोने चांदी खरेदी पासून वंचित राहावे लागले होते . मात्र आता त्यांनाही दागिन्यांची खरेदी करता येणार आहे.