भडगाव ( प्रतिनिधी ) – मोबाईल टॉवरमधून बॅटरी आणि डिझेलची चोरी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगांव ते चाळीसगांव रोडवरिल निंभोरा ता. भडगांव शिवारातील शेतगट नं. २१९/२/५ मध्ये असलेले जिओ कंपनीचे टॉवर आहे. या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी वस्तुंना हात लावण्याचा अलार्म कंपनीला कळाला. त्यावरुन पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचे आदेशावरुन रात्रगस्त करित असलेले पोकॉ/१९५३ प्रकाश गवळी व पोलीस स्टेशनच्या शासकिय वाहनावरिल वाहन चालक पोकॉ/३७१ संभाजी पाटील अशांसह पोलीस स्टेशनच्या शासकिय वाहनाने तिकडे रवाना झाला.
या ठिकाणी पोलीसांना हिरवट मेहंदी रंगाची स्कार्पियो गाडी क्र.॥ ०-२५६८ की रोडवर दुरुन उभी असलेली दिसली. सदर वेळी स्कार्पियो गाडीतील संशयित आरोपींना पोलीस आल्याची चाहुल लागल्यामुळे ते सदर ठिकाणी त्यांचे ताब्यातील नमुद स्कार्पियो गाडीने तेथुन पळुन जाऊ लागले. पोलीस पथकाने या गाडीचा पाठलाग केला. दरम्यान, मळगांब गावाजबळ यातील चोरट्यांनी पळ काढत वाहन तेथेच टाकून दिल्याचे दिसून आले.