आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाला यश
अमळनेर ;- सोमवारी अक्कलपाडा धरणातून सायंकाळी 4 वाजता पांझरा नदीचे 400 क्यूसेस पाणी सुटले असल्याची माहिती आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. पिण्याच्या पाण्याची झाली सोय केली . तालुक्यातील योजना या नदीवर अवलंबून असून त्यांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येते. यंदा आवर्तन उशिरा सुटले असून साधारणतः अक्कलपाडा दोन आवर्तने सोडली जातात. आमदार अनिल पाटील यांनी सतत पाठपुरावा केल्याने धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी अक्कलपाडा धरणातील पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
अक्कलपाडा धरणातील पाणी सोडतांना धरण क्षेत्रातील सर्व के टी बंधाऱ्यांवर लोखंडी पाट्या टाकण्यात आलेल्या असतात. त्यात पाणी अडते आणि पुढील गावांना पाणी पोहचण्यासाठी दीर्घ कालावधी जातो त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे यंदा सर्व बंधाऱ्याच्या पाट्या पाटबंधारे विभागाचे काढून टाकल्या आहेत. त्यामुळे यंदा कमी कालावधीत पाणी थेट कपिलेश्वर मंदिरापर्यंत पोहचेल. अशी आशा आहे. पाणी सुरळीत येण्यासाठी तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ हे या नदीकाठावरील बंधार्यांना भेटी देऊन पाहणी करतील. व लक्ष ठेऊन राहणार आहेत.
गेल्या वर्षी दुष्काळात नदीकाठावरील गावांनी संपूर्ण तालुक्यात टँकरने पोचविले होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई कमी सोडली तरी प्रचंड तापमान आणि बाष्पीभवन होणारे पाणी यामुळे साठे आटू लागले आहेत.
पांझरा काठावरील गावकऱ्यांनी मानले आभार -पांझरा काठावरील गावकऱ्यांनी आमदार अनिल पाटील यांचे आभार मानले असून लवकरच पाण्याचे जलपूजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा राष्ट्रवादी युबक काँग्रेसचे उपाध्यक्ष गौरव पाटील व परिसरातील सरपंचांनी केले आहे.