पुणे (प्रतिनिधी) – मराठी राजभाषा दिनानिमित्ताने नारदीय किर्तन व संगीत क्षेत्रातील मधील महिला युवती किर्तनकर तन्मयी मेहेंदळे यांना “राष्ट्रीय किर्तनरागिणी २०२३” हा सन्मान नुकत्याच झालेल्या एका समारंभात प्रदान करण्यत आला. सन्मानचिन्ह व रोखरक्कम, शाल, श्रीफल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
मधुमती पुणे व ऋतुरंग पुणे या संस्थेतर्फे सन्मान ‘स्त्री’चा, नारदीय किर्तन क्षेत्रात संगीत क्षेत्रात १८ वर्षापासून अधिक कार्यरत असलेल्या पुण्यातील ह.भ.प युवा कीर्तनकार तन्मयी नचिकेत मेहेंदळे ,पुणे यांना प्रदान करण्यात आला. तन्मयी मेहेंदळे यांचे किर्तनाचे शास्रोक्त प्रशिक्षण ह.कि. सभा पुणे येथे व तसेच कीर्तकलानिधी ह.भ.प रामचंद्रबुवा भिडे, कीर्तनविशारद ह.भ.प निवेदिता मेहेंदळे व ह.भ.प डाॅ.नंदिनी पाटील यांच्याकडे झाले असून त्या गोमांतक व महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार कीर्तनकलानिधी डाॅ अनंतबुवा मेहेंदळे यांची नात आहेत.