• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

बिस्किटे, नूडल्स, पास्ता, पिझ्झा, चिप्स, चॉकलेट घेत असाल, तर…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2023
in Uncategorized
0

सावधान ! ‘एफ्.डी.ए.’कडे पाकिटबंद पदार्थांमध्ये वापरले जाणारे घटक ‘वनस्पतीजन्य’ कि ‘प्राणीजन्य’ हे ओळखण्याची यंत्रणाच नाही !

मुंबई (वृत्तसंस्था ) – तुम्ही, जर बाजारातून नूडल्स, पास्ता, पिझ्झा, बिस्किटे, चिप्स, सूप, चॉकलेट आदी बेकरी आणि पाकिटबंद पदार्थ खरेदी करत असाल, तर त्यांच्या पाकिटांवर लिहिलेले ई-कोडिंग तपासा; कारण पाकिटांवर हिरवे चिन्ह असूनही मांसाहारी वा आरोग्यास हानीकारक घटक असू शकतात. कारण पाकीटबंद किंवा अन्य बेकरी उत्पादनांमध्ये वापरले जाणारे ‘इमल्सीफायर्स’ (एक प्रकारचे स्निग्ध पदार्थ) हे प्राणीजन्य आहेत कि वनस्पतीजन्य आहेत, हे ओळखण्याची कोणतीही यंत्रणा महाराष्ट्र राज्यातील शासकीय प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती ‘अन्न आणि औषध प्रशासन विभागा’ने माहितीच्या अधिकारात दिली आहे. त्यामुळे जे शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतात, त्यांना वरील पदार्थांमध्ये प्राण्यांची चरबी किंवा आरोग्यास हानीकारक घटक आहेत का, हे खात्री करण्याची कोणतीही यंत्रणा नाही. हे अत्यंत गंभीर असून या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘अन्न आणि औषध प्रशासन विभागा’ने या संदर्भात यंत्रणा उभी करावी, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात हिंदु विधिज्ञ परिषदेच्या अ‍ॅड्. मृणाल व्यवहारे यांनी मुंबई आणि नागपूर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळांना माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. त्यात वरील माहिती उघड झाली आहे. बेकरी उत्पादने उदाहरणार्थ बिस्किटे इत्यादी कुरकुरीत व्हावीत, म्हणून त्यामध्ये एक प्रकारचे स्निग्ध पदार्थ घातले जातात. त्यांना ‘इमल्सीफायर्स’ म्हणतात. हे ‘इमल्सीफायर्स’ वनस्पतीजन्य किंवा प्राण्यांच्या चरबीपासूनही बनलेले असतात. या पदार्थांच्या पाकिटांवर लिहलेल्या ई-कोडिंगमध्ये E120, E322, E422, E 471, E542, E631, E901 आणि E904 मध्ये प्राण्यांच्या चरबीपासून बनवलेले ‘इमल्सीफायर्स’ असू शकतात. डिसेंबर 2021 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात ‘राम गौरक्षा दला’च्या चिप्समध्ये प्राण्यांच्या चरबीचे मिश्रण असल्याच्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायमूर्ती विपिन सांघी आणि जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने स्पष्ट सांगितले होते की, अन्नपदार्थांतील घटकांचे वर्णन केवळ ई-कोडिंगच्या माध्यमातून न दर्शवता अन्नपदार्थ बनवताना त्यात वनस्पती किंवा प्राणी किंवा प्रयोगशाळेत तयार केलेल्या घटकांचा स्पष्ट उल्लेख प्रमाणासह असला पाहिजे. जेणेकरून लोकांना मांसाहार कि शाकाहार निवडण्याचा अधिकार राहिल. असे असूनही या निर्णयाला हरताळ फासला जात आहे. मागे नेस्लेच्या ‘मॅगी’मध्ये शिसे अधिक असल्याच्या वादानंतर ई-कोडिंग संदर्भात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. ई-कोडिंगमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जातो किंवा लोकांना एखाद्या पदार्थाचे व्यसन लावण्यासाठी आरोग्याला हानीकारक पदार्थ मिश्रित केले जातात, असेही उघड झाले होते. हिंदु विधिज्ञ परिषद यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करत आहे, या संदर्भात जोवर बदल केला जात नाही, तोवर यासंदर्भातील लढा चालूच ठेवणार असल्याचेही परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

एकीकडे मुसलमानांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी पाकिटबंद पदार्थांची निर्मिती करतांना धर्मश्रद्धांचे हनन होऊ नये, यासाठी ‘हलाल सर्टिफाइड’ असे चिन्हाद्वारे दर्शवले जाते. अशी बिगरसरकारी समांतर यंत्रणा देशात उभी राहिली आहे. हिंदू, जैन आणि गैरमुसलमानांच्या धर्मश्रद्धांचा मात्र याठिकाणी विचार होतांना दिसत नाही, हे खेदजनक असल्याची प्रतिक्रिया हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केली.

 

आपला नम्र,

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर,
राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद,
(संपर्क :8451006055)


 

Tags: #hindu rashtra jagruti news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रांत वर्णित सहावे ज्योतिर्लिंग असल्याने याविषयी राजकीय वाद नको ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची भूमिका

Next Post

विवाहितेचा छळ ; तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

विवाहितेचा छळ ; तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !
1xbet russia

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

पोलीस कर्मचाऱ्यांवर संताप : कंत्राटदाराचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न !

June 20, 2025
५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon