पाचोरा (प्रतिनिधी ) – आपल्या पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य श्रीक्षेत्र धामणगाव ते मेहुण मुक्ताबाई पायी दिंडी सोहळा आज जळगाव येथे येऊन पोहोचला समाजात वाढती अराजकता जातीयता भेदभाव एकमेकांविषयी द्वेष हे सर्व कमी करणारी म्हणजे वारकरी परंपरेतील दिंडी दिंडीमध्ये कुठल्याही जातीपातीचा भेद नसतो गरीब श्रीमंतीचा भेद नसतो लहान मोठ्यांचा भेद नसतो म्हणून ज्ञानोबारायांपासून तर तुकोबारायांपर्यंत सर्व संतांनी दिंडीचे विशेष महत्त्व सांगितले आहे
वारकरी संप्रदायामध्ये जर खरा यज्ञ कुठला सांगितला असेल तर पायी दिंडी सांगितला आहे म्हणून संत म्हणतात राम म्हणता वाटचाली यज्ञ पाऊला पाऊली या अनुषंगाने आपल्या पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे संचालक भागवताचार्य योगेश जी महाराज धामणगावकर व त्यांच्या धर्मपत्नी सौ सुनीताताई पाटील या दोघांचा धामणगाव तालुका धुळे येथून भव्य अशा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे दोन जिल्हे आणि पाच तालुक्यातून जाणारा हा दिंडी सोहळा आज जळगाव येथे येऊन पोहोचला दिंडीमध्ये जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे लोक आहेत विविध गावांचे नंदुरबार जिल्ह्यातून साखरी तालुक्यातील धुळे जिल्ह्यातून चोपडा अमळनेर पारोळा धरणगाव चाळीसगाव अशा विविध तालुक्यातून दिंडी सोहळ्यामध्ये वारकरी सहभागी झाले आहेत आणी वारीचा आनंद घेत आहेत आपल्या खानदेशाचे वैभव असणारे संत मुक्ताबाई यांच्या गुप्त स्थान असणाऱ्या तापी तिने मिळून गावाला हा दिंडी सोहळा जात आहे दिंडी सोहळ्यामध्ये दररोज काकडा भजन प्रवचन कीर्तन तसेच ज्या ठिकाणी दिंडी थांबते त्या ठिकाणी स्वच्छता व्यसनमुक्ती विषयी जागर असे विविध सामाजिक विषय घेऊन कन्याभ्रूणहत्या दारूबंदी या सर्व विषयांवर दिंडीमध्ये दररोज समाज प्रबोधन केले जात आहे
दिंडीमध्ये आठ वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या बाबा पर्यंत सर्वच जणांनी अतिशय सुंदर सहभाग घेतला आहे रस्त्याने हरिपाठ हरिपाठ आणि वारकऱ्यांचे खेळ हे होत असतात असा हा दिंडी सोहळा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मेहून येथे पोहोचणार आहे तसेच दोन दिवस मुक्काम करून महाशिवरात्रीला हा दिंडी सोहळा परत पाचोरा येथे येऊन त्या दिंडी सोहळ्याचे समाप्ती होईल.