जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे संत नरहरी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सोनार समाजाचे संत नरहरी महाराज यांच्या ७३७ वी पुण्यतिथी निमित्त शिरसोली सरपंच प्रवीण बारी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली.
यावेळी माजी प.स. सभापती नंदलाल शांताराम पाटील,माजी सरपंच प्रदीप रावसाहेब पाटील, ॲड.विजय रुपला बारी,विकासो.माजी चेअरमन विजय निळकंठ काटोल, तुषार सुरेश बारी.नाना सोनार यांची प्रमुख उपस्थिती होती.
संत नरहरी महाराज यांच्या संदर्भात ॲड.विजय बारी यांनी माहिती दिली तर सुत्रसंचलन भगवान सोनार व आभार अतुल भालेराव यांनी मानले
पुण्यतिथी कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र बाविस्कर, कैलास सोनार,संजय सोनार,विलास सोनार समाधान सोनार, मुकुंदा सोनार,अनिल सोनार,दिपक अहिराव, संजय सोनवणे,गजानन दुसाने,राजु सोनार, यांनी परिश्रम घेतले यावेळी गावातील सुवर्णकार समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.