• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तारखेडा येथील गोडावुनवर पोलिसांचा छापा

तब्बल २६ लाख ८६ हजारांचा अवैध गुटखा जप्त- पोलिस पथकाची मोठी कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनिधी) – तालुक्यातील तारखेडा येथे एका गोडावुन मध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती चाळीसगावचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार करत घटनास्थळी छापा टाकत पथकाने तारखेडा येथील एका गोडावुन मधुन तब्बल २६ लाख ८६ हजार ३६८ रुपयांचा अवैधरित्या साठवुन ठेवलेला गुटखा जप्त करत एका आरोपीस पकडण्यास पोलिसांना यश आले असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चाळीसगावचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना गुप्तचराकडुन माहिती मिळाली की, तारखेडा ता. पाचोरा येथील एका गोडावुन मध्ये राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य गुटखा, पान मसाला व तत्सम पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी साठा करुन ठेवला आहे. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी तात्काळ पोलिस काॅन्स्टेबल अजय अशोक पाटील, महेश अरविंद बागुल, पोलिस नाईक राजेंद्र अजबराव निकम असे पथक तयार करुन रात्री ८ वाजेच्या सुमारास तारखेडा गाठले. गावात पोहचल्यानंतर एक – एक गोडावुन तपासत करत असतांना एका गोडावुन समोर एक इसम बसलेला आढळून आला. पथकाने इसमास विचारपूस केली असता त्याने अनिल काशिनाथ वाणी रा. तारखेडा ता. पाचोरा असे सांगितले. पथकाने गोडवुनची तपासणी केली असता घबाळ बाहेर आले. गोडावुन मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखाजन्य माल मिळुन आला. अभयसिंह देशमुख यांनी अनिल वाणी यास विचारले की, सदरील माल कोणाचा आहे ? त्यावर अनिल वाणी यांनी सांगितले माल हा दिलीप एकनाथ वाणी व गोकुळ एकनाथ वाणी यांचा असुन मी फक्त याठिकाणी विक्री करतो. अभयसिंह देशमुख यांनी तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनला खबर देवुन घटनास्थळी दाखल होण्याच्या सुचना दिल्या. तद्नंतर तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, योगेश गणगे, सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील व पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे घटनास्थळी दाखल होवुन पो. उ. नि. जितेंद्र वल्टे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अवैधरित्या गुटख्याच्या साठ्यासह अनिल वाणी यास ताब्यात घेत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आणले. जप्त करण्यात आलेल्या मालात १८ लाख ६७ हजार ८ रुपये किंमतीची विमल पान मसालाचे ४८ पोते त्यात एका पोत्यात २०८ पाकीटे व पाकीटात २२ पाऊच प्रत्येक पाऊचची किंमत ८.५ रुपये, ९ हजार ९०० रुपये किंमतीची व्ही. १ टोबॅको नावाची तंबाखुच्या ९ गोण्या एका गोणीत ४५० पाकिटे व एका पाकिटात ११ पाऊच एका पाऊचची किंमत २ रुपये, ४ लाख ९९ हजार २०० रुपये किंमतीची राज निवास सुगंधीत पान मसालाचे १३ पोते प्रत्येक पोत्यात २०० पाकिटे व एका पाकिटात ४८ पाऊच एका पाऊचची किंमत ४ रुपये, २ लाख ५४ हजार १०० रुपये किंमतीची व्ही. १ टोबॅको नावाच्या तंबाखुच्या ७ गोण्या एका गोणीत १ हजार ६५० पाकीटे व एका पाकिटात २२ पाऊच एका पाऊचची किंमत १.५ रुपये, ५६ हजार १६० रुपये किंमतीचे सागर पान मसालाचे २ पोते प्रत्येक पोत्यात १३० पाकिटे व एका पाकिटात १२ पाऊच एका पाऊचची किंमत १८ रुपये असा एकुण २६ लाख ८६ हजार ३८६ रुपयांचा अवैधरित्या साठवुन तसेच विक्रीसाठी ठेवलेले राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य गुटखा, पानमसाला पोलिसांनी हस्तगत केला आहे. घटनेप्रकरणी पोलिस काॅन्स्टेबल अजय पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन अनिल काशिनाथ वाणी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन आरोपी अद्याप फरार असुन त्यांचा शोध पाचोरा पोलिस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, जितेंद्र वल्टे हे करित आहेत. या धडक कारवाईमुळे पाचोरा शहरासह परिसरातील अवैध गुटख्याची साठवुन व विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भारतीय जैन संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी लतीश जैन यांची निवड

Next Post

श्री.गो.से.हायस्कूल,पाचोरा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्री.गो.से.हायस्कूल,पाचोरा येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

१३ वर्षीय मुलीला चिकू आमिष दाखवून अत्याचार

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
1xbet russia

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon