जळगाव (प्रतिनिधी) – स्कॉलर डिजिटल इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सकाळी 8:00 वा .मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री अश्विन भाऊ सोनवणे उपमहापौर व नगरसेवक मनपा जळगाव मा.श्री नवनाथ भाऊ दारकुंडे नगरसेवक मा. श्री आप्पासाहेब गुजर adv.ज्योती सुरळकर मॅडम व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे चेअरमन दिपक सुरळकर यांनी होते.मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतमातेचे प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करून कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. स्कूल तर्फे नृत्य , नाटक, समूह गायन , वकृत्व, रनिंग,l संगीत खुर्ची, लिंबू चमचा या गेलेल्या विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण या वेळी करण्यात आले आश्विन सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन भाग्यश्री शिंदे मॅडम प्रास्ताविक स्नेहा डेंगीया मॅडम तसेच आभार प्रदर्शन आरती कौशल मॅडम यांनी केले कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.