जालना (वृत्तसंस्था) – जालना जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकानं ही बंदच राहणार असल्याचे आदेश जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी काढलेत. लॉकडाउनमध्ये काही अंशी सूट देऊन राज्यशासनानं मद्यविक्रीच्या दुकानांना परवानगी दिली आहे. मात्र जालना जिल्ह्यात लाॅकडाऊनसंदर्भात यापूर्वीचेच आदेश कायम ठेवलेत.
जालना जिल्ह्यात परराज्य आणि परजिल्ह्यातून मोठ्या संख्येनं नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळं कोरोनाचं संक्रमन वाढण्याचा धोका असल्यानं ही खबरदारी घेण्यात आली आहे. जिल्ह्यात औद्योगिक कारखाने, कृषीशी निगडीत तसेच अत्यावश्यक सेवा देणारी दुकानच सुरु राहणार आहेत. त्याचबरोबर इंधनात सूट देत सकाळी 7 ते 2 या वेळेत पेट्रोल सर्वसामान्यांना खुलं राहणार असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिलेत.