न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) – अमेरिकेत करोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. न्यूयॉर्क तर हॉटस्पॉट बनले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून न्यूयॉर्क मधील सर्व शाळा, कॉलेज यंदाच्या शिक्षा सत्रा पर्यंत बंद ठेवण्याची घोषणा न्यूयॉर्कचे गव्हर्नर ऍड्रयु क्युमो यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी सर्व शाळांच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, राज्यातील प्रत्येक शाळेतील स्वच्छता, सोशल डिस्टेंसिंगचे नियम कसे पाळायचे याबाबत सूचना दिल्या तसचे येत्या काही दिवसांमध्ये या सर्व महत्त्वाच्या विषयांवर योजना तयार केल्या जातील व काही दिवसात त्यांचा अवलंब केला जाईल असे ही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मुलांना सुरक्षित ठेवण्यास आणि येणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याच्या अधिक योजनांवर विचार सुरू आहे असे एड्रयु क्युमो यांनी यावेळी सांगितले.