जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील हॉटेल पारस नजीकच्या पन्नालाल वखार येथून आरटीओ एजंटची ३० हजार रूपये किंमतीच दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत रविवारी ८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किरण युवराज कोळी (वय-३९) रा. एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. आरटीओ एजंटचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतो. (एमएच १० डीजी ३८६९) क्रमांकाची दुचाकी ही त्याच्या मालकीची आहे. १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता किरण कोळी हा तरूण कामाच्या निमित्ताने दुचाकीने जळगाव शहरातील हॉटेल पारस नजीकच्या पन्नालाल वखार येथे आला होता. वखारीजवळ त्याने त्यांची दुचाकी पार्किंगला लावलेली होता. एक तासानंतर काम आटोपून आल्यानंतर दुचाकीजवळ आला असता त्याला जागेवर दुचाकी दिसून आली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर आठ दिवसानंतर रविवारी ८ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.