चुंचाळे ता.यावल(वार्ताहर) ;- ‘कोरोना ‘ संसर्गिक आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात गरीब व मजूर लोकांचे खूप हाल होत आहे. त्यांना जवळ पैसे नसल्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे कठीण बनले आहे. तेव्हा मानवतेच्या भावनेतून गरीब व गरजू लोकांना आता मदतीची व मानसिक आधाराची गरज आहे. ही गरज ओळखत चुंचाळे ता.यावल येथील मधुकर लक्ष्मण नेवे यांच्या मुलगा चि.गिरीष (बंटी) याचा दि.३ मे रोजी वाढदिवस होता. परंतु बंटीचा वाढदिवस घरी साजरा न करता त्या पैशातून गरजू लोकांना स्वखर्चातून मदत करण्याचा निर्णय नेवे (वाणी) कुटुंबाने घेतला. वाढदिवसानिमित्ताने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले लोसनबर्डी ही आदिवासी वस्तीतील व गावातील गरिब व गरजूना दोनशे किलो गव्हाचे वाटप करण्यात आले व अजून काही गरजु कुंटूबास धान्य द्यायचे असल्याचे बंटी नेवे यांनी सांगितले यावेळी भुषण राजपूत,ईश्वर चौधरी,मनोज कोळी,प्रविण पाटील,भुषण पाटील या मित्रपरिवाराच्या हातून सदर लोसनबर्डी भागातील नागरिकांना गव्हाचे घरपोच वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे श्री सुनिल नेवे एकता फाऊंडेशन च्या सदस्यानी व गावातील सर्व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.