अमळनेर( प्रतिनिधी ) – अमळनेर शहरातील एका परिसरातून एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला मंगळवारी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका परिसरात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला आहे. सोमवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या दरम्यान गावातील विजय बारकू भिल याने अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे. असा संशय मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात मुलीच्या आईने अमळनेर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विजय बारकू भिल याच्या विरोधात मंगळवारी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत करीत आहे.