जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथील शिवारातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरूननेली आहे. याप्रकरणी शनिवारी २४ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, संदीप रघुनाथ बारी (वय-३३) रा. शिरसोली, ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास संदीप हा त्याची दुचाकी (एमएच १९ बीटी ५४१९) ने जळगाव तालुक्यातील रामदेववाडी शिवारातील शेतात आला. त्यावेळी शेताच्या बांधावर दुचाकी पार्क केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. संदीप बारी याने त्याच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे करीत आहे.