अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुरुवार १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमळनेर पोलिसांनी दिलेली माहितीवरून, अमळनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मामासह नातेवाईकांसोबत राहायला आहे. शाळेत ये – जा करत असताना गावात राहणारा अजय दिलीप बाविस्कर हा तिचा पाठलाग करून तिच्यासमोर नाचण्याचा प्रयत्न करतो. ९ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलगी ही तिच्या मामाच्या मुली सोबत बॅडमिंटन खेळत असताना अजय बाविस्कर हा त्या ठिकाणी येऊन तिचा हात पकडला व विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीन मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यांनी तातडीने अमळनेर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी अजय दिलीप बाविस्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत आहे.