जळगाव ;– लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ५ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , जळगाव शहरातील सिंधी कॉलनी, येथील बाबा कुलर नावाच्या | दुकानावर विजय सदानंद लुल्ला, वय 61 वर्ष, रा. सिंधी कॉलनी, जळगाव हा आढळून आला .
मेहरुण परिसरात रोडवर शेख शेरु शेख करीम, वय 36 वर्ष, रा. खदान रोड, बिलाल चौक, तांबापुरा, हा त्याच्या तोंडाला मास्क अगर रुमाल न लावता विनाकारण फिरतांना |मिळुन आला . मेहरुण परिसरात रोडवर इसम चिराग शेख रोशन, वय 30 वर्ष, रा. प्लॉट नं. 56, नवा तांबापुरा, जळगाव हा त्याच्या तोंडाला मास्क अगर रुमाल न लावता विनाकारण फिरतांना मिळुन आला त्यानुसार वरील सर्व आरोपींविरुद्ध भादंवि कलम 188, 269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिंधी कॉलनी, सुखनंदन कपुरचंद अहेरवाल, वय 26 वर्ष, रा. सिंधी कॉलनी तसेच सुखनंदन कपुरचंद अहेरवाल, वय 26 वर्ष, रा. सिंधी कॉलनी,जळगाव हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातुन कोरोना
विषाणु (कोव्हीड-19) चा संसर्ग होऊ नये या करीता रस्त्यावर/उघड्यावर खाद्य पदार्थ विक्री करण्यावर बंदी घालण्यात
आली असतांना खाद्य पदार्थ विक्री करतांना मिळुन आला