नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाऊनचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे. याच दरम्यान, आता दिल्लीमध्ये असलेले केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात ‘सीआरपीएफ’चे मुख्यालय सील करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सचिवाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रविवारी तातडीने हे कार्यालय सील करण्यात आले.
ANI
✔
@ANI
Total 40 officers and staff including a Special Director General rank officer, Deputy Inspector General to be home quarantined.#COVID19 #CRPF https://twitter.com/ANI/status/1256830196608454656 …
ANI
✔
@ANI
After a staff of one of the top officers of CRPF tested COVID-19 positive, CRPF Headquarters in Delhi will be sealed for sanitisation till further orders. No one will be allowed to enter the building: Central Reserve Police Force
View image on Twitter
240
12:54 PM – May 3, 2020
Twitter Ads info and privacy
36 people are talking about this
भारतातील सर्वात मोठे निमलष्करी दल असून, सीआरपीएफच्या विशेष महासंचालक श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्सनल सेक्रेटरीला करोनाची लागणं झाल्याचं रविवारी समोर आले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने सीआरपीएफचे कार्यालय सील करण्याची कार्यवाही हाती घेतले. लोधी रोडवरील सीजीओ संकुलात असलेलं मुख्यालय सील करण्यात आले असून, सीआरपीएफच्या जिल्हा निरीक्षक अधिकाऱ्यांना वैद्यकीय नियमावलीनुसार प्रोटोकॉलचं पालन करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत. करोनाग्रस्त अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्याचं कामही सुरू करण्यात आलं आहे. ४० जणांना क्वारंटाइनमध्ये राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सध्या देशभर कर्तव्यावर असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना करोनाची लागण झाल्याची अनेक प्रकार समोर येत आहेत. महाराष्ट्रातही करोनाचा संसर्ग झालेल्या जवानांची संख्या मोठी आहे. हिंगोली जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांना करोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ नवी मुंबईतील खारघर येथे असलेले सीआरपीएफचे आणखी सहा जवान करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे.