शेंदुर्णी, ता.जामनेर ( प्रतिनिधी ) – येथील ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड (वय-४८) यांनी आपल्या शेतातील नापिकीला कंटाळुन व वाढलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळुन शनिवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी विष घेऊन आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील शेतकरी ज्ञानेश्वर विठ्ठल गायकवाड आपल्या शेतातच दि.१८ नोव्हेंबर रोजी विष घेतले. पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शनिवार दि.१९ नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अडीच एकर कोरडवाहु शेती असलेल्या आपल्या शेती करत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले,एक विवाहित मुलगी असा परिवार असुन त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुबीयांना शासकीय मदत त्वरीत मिळावी अशी मागणी होत आहे.