अमळनेर ( प्रतिनिधी ) – अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच एकाने तिच्या राहत्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्मदिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मारवड पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला आहे. २०२० ते जुलै २०२० पर्यंत गावातील समाधान गुलाब पारधी याने अल्पवयीन मुलीच्या घरात कोणीही नसताना तिच्यावर अत्याचार केले. हा अत्याचार त्याने वारंवार सुरूच ठेवला. या अत्याचारातून पीडित मुलगीही गर्भवती राहिली. त्यानंतर तिने कालांतराने बाळाला जन्म देखील दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर पिडीतेसह तिच्या नातेवाईकांनी मारवड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान गुलाब पारधी यांच्या विरोधात मारवाड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे करीत आहे.