शिरसोली ( प्रतिनिधी ) – येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद पुंडलिक कोल्हे यांना अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. नाशिक विभागाचे शिक्षक आमदार दराडे, मुख्याध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष जे.के.पाटील, सचिव शांताराम पोखरकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करुन पुरस्कार बहाल करण्यात. त्यांच्या या यशाबद्दल बारी समाज माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सचिव सुरेश अस्वार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बारी, शालेय समिती अध्यक्ष कमलाकर तांदळे व सर्व संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले आहे.