जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सुप्रीम कॉलनी येथे माहेर आलेल्या विवाहितेला मारहाण करून शिवीगाळ करत दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला शुक्रवारी नवऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अनिस शरीफ बिस्ती ( वय – 25, रा. पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी जळगाव ) हे आपल्या पत्नीसह राहायला आहे. त्यांच्या कौटुंबिक भांडणातून त्यांची पत्नी माहेरी निघून गेल्या. दरम्यान अनिस शरीफ बिस्ती हा पत्नीच्या घरी 4 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजता गेले असता, त्यांच्यात नवरा – बायकोमध्ये कौटुंबिक वाद झाला. या वादातून अनिस बिस्ती याला राग आल्याने त्याच्या बायकोला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच बाजूला पडलेले वीट सासूच्या डोक्यात मारून जखमी केले.
याप्रकरणी सासू ज्योती प्रकाश ठाकूर ( रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव ) यांच्या फिर्यादीवरून जावई अनिस बिस्ती याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.







