जळगाव ( प्रतिनिधी ) – नवीन बसस्थानकाच्या आवारात अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार शनिवार दि. २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उघड झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात शनिवार २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका अनोळखी वय अंदाजे ६० वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला. याबाबत येथील प्रवशांनी जिल्हापेठ पोलीसांना कळविण्यात आले. जिल्हापेठ पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात रवाना केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. भोळे यांनी मयत घोषीत केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. भोळे यांच्या माहितीवरून जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास पोहेकॉ तुषार जावरे करीत आहे.