जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अशोक टॉकीजच्या बाजूला असलेल्या प्रभात हार्डवेअरच्या दुकानात जवळून एकाची २५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, समाधान सुरेश महाजन ( वय – ४६) रा. अयोध्या नगर, बालाजी मंदिर परिसरात जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहायला असून मजुरीचे काम करून आपला घरखर्च चालवितात. २२ शनिवार ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते साडेतीन वाजेच्या सुमारास ते त्यांची दुचाकी (एमएच १९ बीएक्स ४९८०) याने जळगाव शहरातील अशोक टॉकीजच्या बाजूला असलेल्या प्रभात हार्डवेअर दुकानाच्या बाजूला येऊन कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी दुजाकी हार्डवेअर दुकानाच्या बाजूला पार्किंग करून लावली होती आज्ञात चोरट्याने २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. समाधान महाजन यांनी सर्वत्र परिसरात शोध घेतला दुचाकी कुठेही आढळली नाही.अखेर त्यांनी रविवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता धाव घेऊन जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.