पोलीस अधिक्षकांनी केले निलंबित
जळगाव – मालेगावात कोरोना बंदोबस्तात दांडी मारणाऱ्या तीन पोलीस कर्मचार्यांना पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शनिवारी निलंबित केले आहे. त्यात मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे कॉ.सुरेश रुपा पवार, मुख्यालयाचे प्रसाद सुरेश जोशी व
परवेझ रईस शेख यांचा समावेश आहे.
जळगाव जिल्हयातुन मालेगाव येथे ११० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकरीता पाठविण्यात आले हेाते.
त्यापैकी सहा पोलीस कर्मचारी हे त्यांना नेमुन दिलेल्या कर्तव्याचे ठिकाणी गैरहजर आढळून आले. त्यांचा अहवाल असले बाबत रिपोर्ट पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
मुख्यालयाचे सोनजी सुभाष कोळी, शनी पेठचे राहुल पाटील व राहुल घेटे हे देखील गैरहजर आढळून आले. निलंबित पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी न घेताच मालेगाव ते जळगाव प्रवेश केला.







