जळगाव(प्रतिनिधी)- रेल्वेमार्गाची पर्वा न करता पुलावरून जाण्याच्या प्रयत्नातील एका मतीमंद वृध्दाचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी चार वाजता शिरसोली नजिक घडली.
मिळालेेल्या माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील रहिवाशी पंढरीनाथ रामदास बोबडे हे साठ वर्षीय वृध्द रेल्वेमार्गाची पर्वा न करता पुलावरून जाण्याच्या प्रयत्नात होते त्याचवेळी भुसावळहून मुंबईकडे जाणार्या मालगाडीने त्यांना चिरडले. त्यांचा या अपलाईन खांब क्र.407/ 2 जवळील दुर्घॅटनेत जागीच मृत्यू झाला. ते मतिमंद असल्याचेे कळते असे त्यांच्या काही परिचितांनी सांगितले.
या दुर्घॅटनेची माहिती शिरसोलीचे स्टेशनमास्तर मनोज यांनी पोलिस पाटील श्रीकृष्ण पाटील यांना सांगितल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिली. पो.कॉ. जितेंद्र राठोड, राजू ठाकरे, निलेश भावसार, प्रकाश पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यावर त्यांचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रूग्णालयात करण्यात आले. यापुर्वीही बोबडे यांच्या कुटूंबातील काही लोक अशाच रेल्वे अपघातांमध्ये दगावले आहेत. त्यांच्या पत्नीचेही निधन गतवर्षी रेल्वे अपघातातच झाले होते, असेही सांगण्यात आले.