जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील वडनगरी येथे पळून जाऊन लग्न केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाचे नातेवाईक असलेल्या महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली व परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला बुधवारी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे राहणाऱ्या बेबाबाई गुलाब पाटील ( वय – ४५ ) या महिला आपल्या कुटुंबीयांचा राहायला आहे. त्यांचा पुतण्या प्रमोद पाटील याने गावातील एका मुलीसोबत पळून जाऊन लग्न केले. याचा राग मनात ठेवून मुलीचे नातेवाईक शिवाजी जयराम पाटील, ज्ञानेश्वर वासुदेव पाटील, विनायक उमाकांत पाटील आणि योगिता वासुदेव पाटील ( सर्व रा. वडनगरी ता. जि.जळगाव ) यांनी मंगळवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता बेबाबाई गुलाब पाटील या महिलेला बुक्क्यांनी मारहाण केली व तिच्या संपूर्ण कुटुंबला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात बेबाबाई पाटील यांनी बुधवार १९ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनला घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शिवाजी जयराम पाटील, ज्ञानेश्वर वासुदेव पाटील, विनायक उमाकांत पाटील आणि योगिता वासुदेव पाटील ( सर्व रा. वडनगरी ता. जि.जळगाव ) यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भालेराव करीत आहे.