फैजपूर, ता. यावल ( प्रतिनिधी ) – एका महिलेच्या चेहर्यावर स्प्रे मारून पंजाबी ड्रेसमधील युवकाने तिच्या तरुण नातीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शहरातून एका २२ वर्षांच्या तरूणीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडल्याने घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात संबंधीत तरूणीच्या आजीने फिर्याद दिली आहे. यानुसार प्रांताधिकारी कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यावरून त्यांच्या २२ वर्षाच्या नातीला एका युवकाने पळवून नेले. ही महिला आपल्या नातीसह तेथून जात असतांना हा प्रकार घडला. यात पंजाबी ड्रेस घालून आलेल्या युवकाने महिलेच्या चेहर्यावर स्प्रे मारून तिच्या तरुण नातीला घेऊन फरार झाला. या संदर्भात संबंधीत तरूणीच्या आजीच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.