जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील गवळीवाडा परिसरात राहणारा ४० वर्षीय तरूण घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शनीपेठ परिसरातील गवळी वाड्यात संतोष हरी वाणी (वय-40) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. तो गतिमंद असून 12 ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला आहे. त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही आढळून आला नाही अखरे रविवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता शनीपेठ पोलीस स्टेशनला जावून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक इंदल जाधव करीत आहे.