रावेर( प्रतिनिधी ) – रावेर शहरात हुंडा कमी दिला म्हणून सुनेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर शहरातील शनी मंदिर कॉलनीत रहीवासी हर्षदा कन्हैयालाल मुलचंदानी (वय – ३३) हिच्या लग्नात त्यांच्या वडीलांनी हुंडा कमी दिला. या करणावरुन शहरातील विवाहितेचे सासरे प्रकाश मुलचंदानी, सासु मोहीनी मुलचंदानी, जेठ कैलास मुलचंदानी, जेठानी पार्थना मुलचंदानी यांनी हर्षदा मुलचंदानी हिचा मानसिक छळ करीत असत म्हणून हर्षदा मुलचंदानी हीने देलेल्या फिर्यादी वरुन सासरे,सासु,जेठ,जेठानी विरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला भादवी कलम ४९८ अ ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास एएसआय इस्माईल शेख करीत आहे.