यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पेझरीपाडा वनजमीन परिसरात अवैध वृक्षतोडीच्या गुन्ह्यातील तीन आरोपी फरार झाल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, आज गणेश बळीराम चौधरी (वय ४० वर्ष) वनरक्षक, बोरखेडा खुर्द वनक्षेत्र तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डोंगरकठोरा वन पारिमंडळ वनक्षेत्र यावल या मधील ०६ / २o२२ आणी ८ ऑगस्ट २०२२ अन्वये दाखल गुन्ह्यातील कायदेशीर रखवालीत असलेले आरोपी सुरेश किसन पावरा, प्यारसिग झोमसिंग पावरा , बिलरसिंग झामसिंग पावरा ( बारेला ) सर्व राहणार पेझरीपाडा तालुका यावल हे तिघ आरोपी यावल पोलिस स्टेशनच्या क्षेत्रातुन माझी व आमच्या सहकाऱ्यांची नजर चुकवुन अंधाराचा फायदा घेत पळुन गेले. फरार आरोपींचा शोध घेतला पण ते न सापडल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये भाग ५ / गुऱन ४५८ / भादवी कलम २२४ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर हे करीत आहे.