यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील मनवेल येथील वृध्दाने आपल्या आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ आँक्टोंबर २०२२ रोजी दुपारी घडली. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोवर्धन भालेराव (वय ६५) रा. मनवेल, ता.यावल हे आपल्या कुटुंबियांसह राहायला होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. नेहमीप्रमाणे घरातील सदस्य शेतात कामाला निघून गेले होते. त्यावेळी गोवर्धन नाती सोबत घरीच होते. त्यांनी नातीला चहा बनविण्यासाठी सागीतले व घरा शेजारी असलेल्या छप्परात छताला असलेल्या लाकडी सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुल, सूना नातंवड असा परीवार आहे. दगडी गावाचे पोलीस पाटील विठ्ठल गोरख कोळी यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.