नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले मुलायमसिंह यादव यांचे आज निधन झाले. . युरिनरी इन्फेक्शन, रक्तदाबाची समस्या आणि श्वासोच्छवासाचा त्रास यामुळे मुलायमसिंह यांना २ ऑक्टोबरला मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते.मेदांता यांच्या आयसीयू आणि क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये नऊ दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील झुंज दिल्यानंतर सोमवारी सकाळी 8:16 वाजता नेताजींनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी सकाळी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.