पाचोरा (प्रतिनिधी ) – पाचोरा येथील शिवसेनेच्या सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी अगदी कमी दिवसात पाचोरा शहरवासांचे मने जिंकली कुठलीही कार्यक्रम असो सुख असो या दुःख असो सौ वैशालीताई सूर्यवंशी प्रत्येक ठिकाणी हजर असतात.

गणपती उत्सव नवरात्र दसरा असे अनेक छोटे-मोठे कार्यक्रम या ठिकाणी हजर राहून सहकार्याची भूमिका केली . सौ वैशालीताई सूर्यवंशी यांच्याकडे निर्मल इंटरनॅशनल स्कूल या एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिलेली जबाबदारी सुद्धा ते पार पाडत आहे . शिवसेनेचा झेंडा हाती घेऊन कार्य करीत आहे . त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन आपले कार्य चालू ठेवले असून आज रोजी त्यांनी वाल्मीक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त भेट देऊन तसेच मुस्लिम समाजाच्या रॅलीलाही भेट देऊन ताईंनी सर्व धर्म समभाव जपला आहे. शेतकरी सेना रमेश बाफना, आनंद संघवी ,युवासेना उपजिल्हा प्रमुख संदीप जैन नगरसेवक दत्ता जडे ,दादाभाऊ चौधरी, अनिल सावंत गफ्फार भाई , निलेश पारोचे ,हरीश देवरे, प्रशांत सोनार, सुनील काळे ,बबलू भोई ,डॉ. मोरे , धर्मा ,संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील ,पप्पु जाधव, अभिषेक खंडेलवाल ,मुकेश तुपे ,जीभाऊ शिवसैनिक युवासैनिक संभाजी ब्रिगेड पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.







