जळगाव (प्रतिनिधी ) दारुबंदी सप्ताह निमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्याला अवैध दारू निर्मिती करणाऱ्या हातभट्ट्यांवर जळगावच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी धाडी टाकून अवैध दारू, रसायन आणि निर्मिती कार्नार्ण्यास अलंगणारे साहित्य नष्ट केले आहे.
02 ऑक्टोबर ते 08 ऑक्टोबर हा कालावधी दारुबंदी सप्ताह म्हणुन दरवर्षी पाळला जात असतो. सदर कालावधी मध्ये अवैध मदय निर्मीती, वाहतुक, विक्री इ. विरुध्द मोठयाप्रमाणात मोहीम राबविण्यात येत असते. यावर्षीसुध्दा मा. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई कांतीलाल उमाप, मा. संचालक, सुनिल चव्हाण, मा. विभागीय उपायुक्त, नाशिक विभाग अर्जुन ओहोळ व प्रभारी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव जिल्हयात दारुबंदी सप्ताहामध्ये विशेष मोहीमेचे नियोजन करण्यात आलेले होते त्यात जिल्हयात 02 ते 08 ऑक्टोबर पर्यंत खालीलप्रमाणे कामकाज करण्यात आलेले आहे.
एकुण रु 20,92,595/- किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये अवैध दारुचे अड्डे याठिकाणी कार्यवाही करुन दारुचा अड्डा चालविणारे एकुण ६ जणांवर कारवाई करून १६ ग्राहकांवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत कारवाई करुन न्यायालयात हजर केले असता एका प्रकरणात तीन आरोपींना मे. न्यायालयाने प्रत्येकी रु 1000/- असा एकुण 3000 रुपये दंड केलेला आहे.इतर प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. सदर कारवाई जळगांव जिल्हयातील अधिकारी सी.एच. पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जळगांव, सुजित कपाटे निरीक्षक, भुसावळ, अन्वर खतिब निरीक्षक, पुरनाड दु. निरीक्षक, विलास पाटील, आनंद पाटील, चेतन शिंदे, शिवबा भगत, सोमनाथ शेलार, सतिष पाटील, अमोल भडागे, सोनार , देवदत्त पाचपोळ, सहा. दु. निरीक्षक, मधुकर वाघ, ईश्वर बावीस्कर जवान सर्वश्री नरेंद्र पाटील, मुकेश पाटील, अजय गावंडे प्रतिकेश भामरे, दिनेश पाटील, रघुनाथ सोनवणे, सत्यम माळी, धनसिंग पावरा, प्रकाश तायडे, शशीकांत पाटील, नितीन पाटील, सागर देशमुख, योगेश राठोड,विठठल हटकर, भुषण परदेशी, अमोल पाटील, विजय परदेशी,
नंदु नन्नावरे गोकुळ अहीरे व आदी सहकारी यांनी पार पाडली. नागरीकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, मदय खरेदी ही फक्त अधीकृत अनुज़प्तीमधुनच करावी तसेच मदयप्राशन हे विधीवत मंजुर अनुजप्तीजागेतच मदय परवाना घेवुनच करावे अन्यथा महाराष्ट्र दारुबंदी अधि नियमानुसार कारवाईस पात्र रहाल. अवैध मदय निर्मीती, वाहतुक विक्री अथवा परराज्यातील मदय, मदयार्क याबाबत काहीही तक्रार/ माहीती असल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999 वर अथवा व्हाटसअँप क्रमांक 8422001133 वर संपर्क करावा.असे आवाहन करण्यात आले आहे.