स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्हा उघड ; आरोपी ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी ) तालुक्यातील भादली येथील पाटचारीत एका युवकाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता . याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने तपास चक्रे वेगात फिरवून मित्रानेच मित्राची निर्घृण हत्या हात उसनवारीच्या पैशांतून केल्याचे उघड झाले असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे .
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, ०३ऑक्टोबर रोजी जळगाव येथील तरुणाची हत्या करून भादली येथील पाटावरत्याचे प्रेत मिळून
आल्याने सदर ठिकाणी .पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक .चंद्रकांत गवळी यांनी भेट देवून
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना सदर गुन्ह्या उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यावरुन किसन नजन पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील सपोनि जालींदर पळे,पोउपनिरी अमोल देवढे, सफौ रवि नरवाडे, पोह संजय हिवरकर, राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन,अक्रम शेख, संदिप सावळे, पोना रणजीत जाधव, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, नितीन बाबीस्कर, प्रितम पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, रमेश जाधव सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.
पोनि किसन नजन पाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फतबातमी मिळाली कि, मयत सौरभ यशवंत चौधरी व त्याचा साथीदार ईश्वर नथ्थु सपकाळे हे नेहमी सोबत राहत असून साधारण४ ते ५ दिवासापुर्वी या दोघांचा वाद पैशांवरून झाला होता. ईश्वर नथ्थु सपकाळे याचा शोध घेतला असता तो दिनांक ०३/१०/२०२२ रोजीसकाळ पासून घरी नव्हता. त्यावेळी त्याचे घरच्यांना त्याबाबत विचारपुस केली असता तो कुठे गेला याबाबत सांगता येणार नाही असे सांगीतले.इंग्वर नथ्थु सपकाळे हा मुळचा कानळदा ता.जि.जळगाव येथील राहणार असल्याने त्याचा सदर मागात शोध घेतलाअसता तो आज ६ रोजी कानळदा शिवारात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास विचारपुस केली असता मयत सौरभ यशवंत चौधरी, रा.दशरथ नगर जळगाव याने माझे कडून हात उसनवार पैसे घेतले.२ रोजी ०९.३० वा.चे सास मोटार सायकल वर मयत सौरभ चौधरी असे श्रीराम चौक ,जेनाबाद येथून निघुन भादली येथील पाटचारी वर बसून गप्पा मारत असतांना मयत सोरभ चौधरी यास हातउसनवारीचे पेसे मागण्यास गेलो असता दोघान्मध्ये वाद झाला . यावेळी आरोपीने धारदार शस्त्र व लोखंडीरॉडने त्यास मारून जिवेटार केले बाबत सांगत असून गुन्ह्यांची कबुली दिली . याप्रकरणी एलसीबीने आरोपीला ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास सुरु आहे.