जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाच्या वतीने परिणामवाचक योग्यता या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.

प्रोजेक्ट जेनेसिस, इन्फोसिस बीपीएम, पुणे अंतर्गत झालेल्या या कार्यशाळेत प्रा. मनिष जोशी यांनी मार्गदर्शन करतांना परिणामवाचक, तार्किक, शाब्दिक क्षमता आदींची माहिती दिली. यावेळी कक्षाचे समन्वयक प्रा. रमेश सरदार, उपसमन्वयक डॉ. उज्ज्वल पाटील, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा उपस्थित होते.







