नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने काल सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवला आहे. मात्र, हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्रांने देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या कामगारांचे घरी जाण्याचे मार्ग खुले केले. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे याबाबतची माहिती देण्यात आली या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी नरेंद्र मोदी यांचा ट्विट करत खरपूस समाचार घेतला आहे.
P. Chidambaram
✔
@PChidambaram_IN
April 29 – no response to demand to allow migrant workers to go back home.
April 30 – buses will be allowed to transport them.
May 1 – non-stop trains will be allowed.
Belated wisdom is better than no wisdom.
It is another example of poor thinking and haphazard planning.
4,038
10:21 AM – May 2, 2020
Twitter Ads info and privacy
1,152 people are talking about this
पी चिदंबरम यांनी ट्विट केले आहे,’२९ एप्रिल – अडकलेल्या कामगारांचे घरी जाण्याचे मार्ग खुले करण्याच्या मागणीला कुठली प्रतिक्रिया देण्यात आली नाही. ३० एप्रिल – अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी बस सेवांची अनुमती देण्यात आली तसेच 1 मे ला नॉन स्टॉप ट्रेनची अनुमती देण्यात आली उशिरा का होईना या प्रश्नांवर लक्ष घातले आहे. हे निष्क्रिय विचार आणि मूर्खपणाचे उदाहरण आहे.’ असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे.