जळगाव (प्रतिनिधी ) दिनांक २ ऑक्टोबर ,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५४ वी व भारतीय स्वातंत्र्य सेनानी लाल बहादूर शास्त्री यांची ११९ वी जयंती जळगाव येथील पोदार जम्बो किड्स येथे उत्साहात साजरी करण्यात आली.”बापू ओर शास्त्रीजी कि कहाणी,जम्बो कि जुबानी’ ही यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना होती.महात्मा गांधीजी हे पोदार एजुकेशन ग्रुपचे पहिले अध्यक्ष होते.याप्रसंगी पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ यांनी नियोजित कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कार्याक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ९:०० वाजता करण्यात आली.
पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .या प्रसंगी त्यांनी उपस्थित पालक तसेच शाळा विकास समिती च्या प्रतिनिधींचे स्वागत केले.
यावेळी ५ अद्वितीय कलांचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थित पालकांनी महात्मा गांधी व शास्त्रीजींच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली व बापूजींच्या प्रतीकात्मक पादुकांचे दर्शन घेतले.
बापुजींनी अवलंबिलेल्या सत्य,अहिंसा व स्वदेशीचा पुरस्कार या वचनांना अनुसुरून दांडी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते वर्गाखोलीपर्यंत ही दांडी यात्रा निघाली. त्यात प्रथमेश पाटील याने गांधीजींची भूमिका साकारली,अवनीश चौधरी लालबहादूर शास्त्रीजींची वेशभूषा धारण केली तर कु.ध्येया पाटील हि कस्तुरबा च्या वेशात होती. ’जय जवान जय किसान ‘ सत्यमेव जयते अश्या घोषणा देण्यात आल्या.
‘बापूजी की कुटीया’ मध्ये पालक तसेच जम्बो किड्सच्या चिमुकल्यांनी बापूजींच्या वकील, चरखा कामगार,सफाई कामगार,चर्मकार,न्हावी अश्या विविध रूपांचे दर्शन घेतले.यावेळी पालक व विद्यार्थ्यांसाठी ‘पपेट शो’ चे आयोजन करण्या आले होते.साबरमती देखाव्याचा आनंद उपस्थितांना घेता आला..
यावेळी पोदार जम्बो किड्सच्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी महान देशभक्तांसाठी दर्शविलेल्या आदर व सन्मानाची उपस्थित पालकांनी प्रशंसा केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री गौकुळ महाजन यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी पोदार जंबो किड्स च्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ, प्रशासकीय अधिकारी श्री जितेंद्र कापडे, ,शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शिविली होती.