जळगाव ( प्रतिनिधी ) – अखिल भारतीय तेरपंथ युवक परिषद, अंतर्गत तेरपंथ युवक परिषद जळगाव व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ सप्टेंबर २०२२रोजी पदवीदान सभागृहात रक्तदान शिबीर संपन्न झाले.या शिबिरात जवळपास १५० जणांनी रक्तदान केले.
या शिबिरासाठी अध्यक्ष सुदर्शन बैद,रुपेश सुराणा,पंकज बैद,अमित छाजेड,निरीज सेठीया,मुदीत छाजेड,राहुल छाजेड,आदित्य समदरिया प्रियंशु सुराणा,प्रदीप सेठिया,मोहित सेठिया,रासेयोसंचालक डाॕ. सचिन नांद्रे,रासेयो विद्यापीठ कार्यक्रम अधिकारी डॉ सी टी आगे, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सायंकाळी शिबिराला भेट दिली.परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल हे देखील उपस्थित होते.