जळगाव ( प्रतिनिधी ) – असोदा रेल्वे गेट समोर तरुणाची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश प्रकाश हजबन (वय – ३८) रा. कला वसंत नगर आसोदा रेल्वे गेट जवळ जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. गुरुवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान त्याची मोटरसायकल (एमएच १९ बीटी ५६०४) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले. दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी कुठेही आढळून न आल्याने अखेर शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहे.