जामनेर (प्रतिनिधी ) शहरातील गणपती बाप्पाचे विसर्जन करीत असताना युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली असून एका लहान बालकाला पाण्यात बुडताना वाचवून स्वतः बुडून मृत्यू झाल्याचा या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे . किशोर राजू माळी वय वर्ष 30 असे मयत युवकाचे नाव आहे. दोन तासांच्या परिश्रमानंतर किशोर याचा मृतदेह सापडला. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्याचे काम सुरु होते.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, कांग नदी पात्राच्या पुलावर गणपती विसर्जनासाठी आलेला एक लहान मुलगा बुडत असल्याचे पाहून गणेशवाडीच्या किशोर माळी याने क्षणाचाही विलंब न करता पेटंट उडी घेऊन त्या मुलाचे प्राण वाचविले. मात्र हे करीत असताना किशोर हा बुडू लागल्याने त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला.
त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील एक लहान भाऊ असा छोटासा परिवार आहे घरातील कर्ता पुरुष गेल्याने माळी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुर्दैवी घटनेने जामनेर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे .