जामनेर (प्रतिनिधी) – नाचणखेडा येथे स्टेट बॅकेचे एटीएम मशीन चोरुन नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
५ सप्टेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी शिवाजी चौक, शिवाजी नगर, नाचणखेडा येथील स्टेट बॅकेचे एटीएम. नं. CFBA०००५५९०१३ याक्रमाकांचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी कॅबीनचा उघड्या दरवाज्यातून आत येत एटीएम मशीनचा कॅबीनचा दरवाजा तोडला. त्यानंतर मशीन कॅबीनमधुन बाहेर काढुन मशीनची तोडफोड करुन चोरुन नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध दीपक दौलत तिवारी (वय ३८, रा.सोपान नगर, सत्यम पार्क, जळगाव) यांनी फिर्याद दिल्यानुसार पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप.निरीक्षक संज करीत आहेत.