जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 43 वर गेली आहे
जळगाव (प्रतिनिधी )
चोपडा तालुक्यातील एका 65 वयातील शशियत महिलेचा 2 मे रोजी पहाटे 5 वाजता जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना झाली आहे. अद्याप या महिलेचा रिपोर्ट येण्याचे बाकी आहे.
या महिलेच्या मृत्युंनतर जिल्ह्यात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या 12 झाली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे प्रशासन सांगत आहे जळगाव, अमळनेर भुसावळ व पाचोरा तालुक्याला कोरोनाने विळख्यात घेतलेले असल्याने जिल्हा रेड झोन मध्ये गेलेला आहे त्यामुळे आता 18 मे पर्यंत जिल्ह्यात लॉक डाउन ची कडक अंमलबजावणी होऊ शकते
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 43 वर गेली आहे