जळगाव (प्रतिनिधी ) – गोदावरी फॉउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे आज राज्यस्तरीय भावगित स्पर्धेचे आयोजन केले आहे.
गेल्या २४ वर्षापासून ही स्पर्धा आयोजीत केली जात असून अनेक गायक कलाकारांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. गेल्या २ वर्षापासून कोविड परिस्थीती मूळे सदर स्पर्धा बंद होती मात्र आता या वर्षी ही स्पर्धा पुन्हा घेण्यात येणार आहे.
बालगटात १ ते ११ वय, किशोर गट १२ ते १८ व प्रौैढ गटात १८ ते ४० अशा तिन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक गटात स्वतंत्र प्रथम,व्दीतीय आणि तृतीय बक्षीस देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा ही फक्त हौशी कलाकारांसाठी असून व्यवसायिक व आकाशवाणी कलाकारांना यात सहभाग मिळणार नाही. स्पर्धेसाठी साथसंगत साथीदार कलाकाराने सोबत आणावे. बक्षीसे पुढील प्रमाणे बालगट प्रथम १००१/—,व्दीतीय ७०१/—आणि तृतीय ५०१/— किशोर गट १५०१/—प्रथम, १००१/— व्दीतीय, ७०१/— तृतीय, प्रौढ गट २००१/— प्रथम, १५०१ व्दीतीय, तर तृतीय १००१/— याच बरोबर करंडक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत ९ संप्टेबर पर्यंत असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन गोदावरी संगित महाविद्यालय जळगाव तर्फे करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ९९२१९९६९७४,९८५००७५६५१ यांच्याशी किंवा भास्कर मार्केट जळगाव कार्यालयात संपर्क साधावा.