अहमदाबाद (वृत्तसंस्था ) – गुजरातमध्ये कॉंग्रेसची सत्ता आल्यास COVID दरम्यान मृत्यू झालेल्यांना कुटुंबीयांना ४ लाख रुपये भरपाई तर शेतकऱ्यांना मोफत वीज आणि सर्वसामान्य ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देण्याचं आश्वासन कॉंग्रेस नेते राहुल गांधीनी केलं आहे. तसेच मला बेरोजगारी संपवायची आहे. गुजरातमधील 10 लाख तरुणांना रोजगार द्यायचा आहे. म्हणून गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाच सरकार येईल असा विश्वास राहुल गांधीनी दर्शवला आहे.
तसेच कॉंग्रेसचं सरकार आल्यास गुजरामध्ये 3000 इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. एवढचं नाही तर दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान, 1000 रुपयांना विकले जाणारे गॅस सिलिंडर 500 रुपयांना, शेतकऱ्यांना 3 लखांपर्यतची कर्जमाफी अशा विविध मोठी आश्वासन देत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुजरातमधील जनतेला संबोधित केले.